फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवर बंदी?

फेब्रुवारी महिन्यातील सर्वात उत्तम बातमी कोणती? या प्रश्नाचे उत्तर माझ्यासाठी एकच आहे ते म्हणजे ( Ministry of health and family welfare) आरोग्य विभागाने फेअरनेस क्रिमच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे़. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जवळपास सगळ्याच "news channels" वर हिच बातमी झळकत होती. "गोरा रंग " मिळवून देणार्‍या जाहिराती बंद झाल्या नाही तर ५ वर्ष …

२०१९ ला निरोप देताना…

आज सकाळी भिंतीवरील 'कालनिर्णय' ने आठवण करुन दिली की डिसेंबर महिना चालू आहे, आणि अगदी काही दिवसांत २०२० सुरू होणार आहे. २०१९ ला निरोप देताना या वर्षामध्ये घडलेल्या काही विशेष घटनांचा आढावा घ्यावासा वाटतो. सर्वप्रथम २०१९ सुरू होताना ठरवलेल्या Resolutions ची आठवण होते. सकाळी लवकर उठण्यापासून ते रोज रात्री brush करून झोपण्यापर्यंत एक लांबलचक यादी …

समाजभान -जेंव्हा यश पदरात येतं….

नुकतेच आता शालांत, महाविद्यालयीन, विद्यापीठ निकाल लागून बरीच मुलं मोकळी झाली असतील. काही अपयशामुळे थोडीशी खचून ही गेली असतील; पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यश आणि अपयश या समाज प्रकृती आहेत ज्या समाज विकृतांना भानावर आणतात. त्यामुळे ज्यांना अपयश आलं आहे त्यांनी कदापि खचून जाऊ नका आणि ज्यांना यश मिळालं आहे त्यांनी कधीही उडून जाऊ …

हितगुज…

हितगुज या शब्दाचा अर्थ संवाद आहे. मग आपण सरळ संवाद या शब्दाचा वापर का करत नाही? हितगुज या शब्दाची आपणास का गरज भासते? शब्दकोशाप्रमाणे हितगुज शब्दाचा अर्थ वाचला तर तो खाजगी संवाद किंवा व्यक्तीच्या आवडीचा संवाद असा आहे. म्हणजेच संवादापेक्षा हितगुज ही मनाच्या जास्त जवळ आहे. हितगुज ही दोन व्यक्तींमधील संवाद नाही तर ती एक …

एक अशी संध्याकाळ असावी…

एक अशी संध्याकाळ असावी, जिथे सूर्याला धरणीची ओढ असे जिथे सागर मिठीत घेऊनि, क्षितिज तांबूस भासे || एक अशी संध्याकाळ असावी, जिथे एकांताचा भास नसे जिथे पाखरांच्या थव्यासम, घर परतीची आस असे || एक अशी संध्याकाळ असावी, जिथे रुक्ष उन्हाची जाण नसे जिथे थंड वाऱ्याच्या झोक्यासंगे , पुष्प-लतांचा वास असे || एक अशी संध्याकाळ असावी, …

गणेशोत्सव, मुंबई आणि मी – आगमन

अचानक एक दिवस आपणास आपले राहते घर सोडून नव्या शहरात जाऊन रहावे लागले तर? काही वैयक्तिक कारणांसाठी किंवा कामानिमित्त जर दुसऱ्या शहरात स्थायिक व्हावे लागले तर? असे विचार मनात आले कि पुढचा प्रश्न लगेच डोकावतो. या शहरातील अशी कोणती गोष्ट आहे जी मी कधीच विसरू शकणार नाही. प्रत्येक व्यक्ती साठी या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे असेल. …

रेनकोट

लहानपणापासूनच पावसाची मला फार आवड आहे. त्यात मुंबईचा पाऊस म्हणजे वेगळे वर्णन करण्याची गरज नाही. एप्रिल, मे च्या रखरखत्या उन्हामध्ये बेजार झालेल्या आमच्या जीवाची तहान हा पाऊस भागवतो. पावसाळा आला कि छत्री, रेनकोट सगळ्याची खरेदी सुरु होते. चहूबाजूला हिरवळ दाटू लागते. आणि श्रावण सरींनी निसर्ग खुलून येतो. हा पाऊस माझ्या मनावरची काजळी दूर करून नव्या …

प्रिय आई, बाबांस …

बेधुंद करणाऱ्या संगीतापेक्षा, आजही तुझी अंगाई भावते । रोलरकोस्टर राईडपेक्षा बाबांच्या ' झोक्यात ' मन हे झुलते ।। लटकेच रुसून अजूनही, कोपऱ्यात बसावेसे वाटते । तुझ्या गोड धपाट्यासाठी, आजही खोडी करावीशी वाटते ।। हात तुमचा हाती धरून, मुक्त भटकावेसे वाटते । परत येताना मात्र एकतरी, पैज जिंकावीशी वाटते ।। आयुष्यभर झटणाऱ्या त्या हातांना, आता सावरावेसे …

माझे मन

माझ्या या मनाचे , काय सांगू वागणे न सांगताच मला, कसे तुझ्यामध्ये गुंतले क्षणभर तुला न पाहता , बैचेन होऊन गेले चाहूल तुझी होताच, पुन्हा खुलून आले सोबतीची तुझ्या, स्वप्न दाखवून गेले नवीन आयुष्याचे, तराणे रंगवुनी दिले कैफियत या मनाची,  कळणार कशी तुला शब्दांची गरज का, मनाच्या भाषेला गोड हसायचे, वा छुप्या नजरभेटीचे तुलाही समजले, …

I Love You

व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू झाला आहे त्यामुळे रोझ डे ,  टेडी डे, चॉकलेट डे,  प्रपोज डे अशे वेगवेगळे दिवस साजरे केले जात आहेत. या निमित्ताने पहाटे रोज नवीन व्हाट्सएप स्टेटस पहयला मिळते. प्रेमात असलेली मंडळी मोठ्या हौशीने हे दिवस साजरे करतात. यावेळी त्यांच्या खिशाला मोठी कात्री पण लागते. पण काय करणार "प्यार मे सब चलता है …